जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्राध्यापकाला एका परदेशी मुलीशी लंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून काढून टाकण्यात आले आहे. चौकशी समितीला हा प्राध्यापक दोषी असल्याचे दिसून आले आहे. परदेशी मुलीने त्याच्याविरूद्ध लंगिक गैरवर्तनाची तक्रार केली होती. ही मुलगी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत होती. विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाची बठक घेण्यात आली, त्यात या प्राध्यापकास काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्राध्यापकाने तिला घरात पार्टीला बोलावून तिच्याशी गरवर्तन केले होते. नंतर या मुलीने लिंगभाव संवेदनशीलता समितीकडे लंगिक छळाची तक्रार नोंदवली होती, त्यात समिताला हा प्राध्यापक दोषी असल्याचे दिसून आले होते व नंतर त्याला निलंबित करण्यात आले. विद्यापीठ कार्यकारिणीच्या नंतर झालेल्या बठकीत या प्राध्यापकाला बडतर्फ करण्यात आले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
गेल्याच आठवडय़ात मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत असे सांगितले होते की, २०१३-१४ या काळात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात लंगिक छळाच्या २५ तक्रारी आल्या होत्या व आपल्या देशात ज्या १०४ उच्च शिक्षण संस्था आहेत त्यात लंगिक छळाच्या तक्रारीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीच्या महिला आयोग अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी असे सांगितले होते की, दिल्लीत २०१३ पासून ज्या १६ शैक्षणिक संस्थांतून लंगिक छळाच्या तक्रारी आल्या आहेत त्यांची संख्या १०१ असून त्यातील पन्नास टक्के तक्रारी या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आहेत.

Story img Loader