एका २२ वर्षीय मुलीला वर्गामध्येच भोसकून तिच्या प्रियकराने स्वत:चे मनगट चिरून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये २०३ क्रमांकाच्या वर्ग खोलीमध्ये ही खळबळजनक घटना घडली.
जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी तात्काळ सफदरजंग रूग्णालयात हलवण्यात आले असून, तिच्यावर अद्याप शस्त्रक्रिया सुरू आहे. या तरूणीवर जीवघेणा  हल्ला करणाऱ्या तरूणावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत.
हल्ला झालेल्या तरूणीची ओळख पटली असून, तिचे नाव रोशनी आहे. तिच्यावर हल्ला करणाऱ्याचे नाव आकाश आहे. सकाळी ११.१५ वाजता ही दुर्दैवी घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोर आकाश रोशनीवर हल्ला करण्याच्या पूर्वतयारीमध्येच आला होता. तो कुऱहाड व सुरासोबत घेऊन आला होता, असे सूत्रांनी सांगितले.
रोशनी व आकाश दोघे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील भाषा विभागामध्ये कोरियन भाषेच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. रोशनीचे इतर मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. विकोपाला गेलेल्या भांडणात आकाशने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने रोशनीवर वार केले व नंतर स्वत:चे मनगट कापून घेतले.

Story img Loader