पीटीआय, नवी दिल्ली
विद्यार्थ्यांनी राजकारणासाठी अभ्यासात तडजोड करू नये, असा सल्ला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी दिला आहे.जेएनयूच्या परिसरात विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन करण्याच्या विरोधात कठोर उपाययोजना लागू केल्याने निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू शांतीश्री धुलीपुरी पंडित यांनी हा सल्ला दिला आहे.
पंडित म्हणाल्या की, शिस्तभंगाची कारवाई विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी मिळवण्याच्या संधींवर विपरित परिणाम करू शकते. विरोध करू नका, असे कोणीही असे म्हणत नाही. परंतु तुमच्या अभ्यासात तडजोड केली जाऊ नये हे देखील लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वातंत्र्याचा जबाबदारीने वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.