जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याने देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याची माहिती गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने पीटीआयला दिल्याचे वृत्त आहे.
गृहमंत्रालयातील एका अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी घोषणा दिल्या जात होत्या त्यावेळी कन्हय्या कुमार त्याठिकाणी उपस्थित होता. मात्र, त्याने कोणतेही देशविरोधी नारे दिले नाहीत. कन्हय्याविरोधात देशद्रोहासारखा गंभीर आरोप करणे म्हणजे दिल्ली पोलिसांतील काही अधिकाऱयांनी अति उत्साह दाखवण्यासारखे आहे. त्याच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असे दिसत नाही. गृहमंत्रालयाकडून पीटीआयला देण्यात आलेल्या या माहितीमुळे ‘जेएनयू’ प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘जेएनयू’ प्रकरणाचे सर्वपक्षीय बैठकीत तीव्र पडसाद
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कन्हय्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचे सांगितले आहे. आज कन्हय्या कुमारची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असून, त्याला दिल्ली कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा