अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या स्वयंघोषीत साधू आसाराम बापूंची जोधपूर पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच पोलीस लैंगिक अत्याचार करण्यात आलेल्या घटनास्थळाची पडताळी करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
जोधपूर पोलीसांनी इंदौर येथील आश्रमातून आसाराम बापूंना रात्री १२:१५ वाजता अटक करून तातडीने जोधपूरला हलवण्याची तयारी केली.
जोधपूर पोलीसांनी आसाराम बापूंना अटक करून इंदौरच्या विमानतळावर आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना विमानाने जोधपूर नेण्यात आले आहे. दुपारी दोनच्या सुमारास पोलीस आसाराम बापूंना घेऊन जोधपूर विमानतळावर दाखल झाले. 
दरम्यान, आसाराम बापूवर आरोप केलेल्या मुलीच्या पालकांनी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. “माझ्या मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी आसाराम बापूंना अटक होईपर्यंत अन्नाचा कण घेणार नाही” असे म्हणत पीडित मुलीचे वडील उपोषणाला बसले होते.
जोधपूर येथील आश्रमात आसाराम बापू यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप मुलीने केला आहे. तेव्हापासून पोलीस त्यांच्या चौकशीसाठी शोधात होते. याप्रकरणी बापूंना जोधपूर पोलिसांनी ३० ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचा समन्स धाडला होता. पण, बापू काही हजर झाले नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा