अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी ‘स्वयंघोषित गुरू’ आसाराम यांना पोलिसांनी ३० ऑगस्ट पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जोधपूरच्याच आश्रमात आसाराम यांनी १६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या जोधपूर पोलिसांनी अहमदाबाद येथे जाऊन आसाराम बापूंना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. काल रविवारी पोलिसांनी जोधपूर येथील आश्रमात जाऊन काही सदस्यांची आणि या मुलीच्या भावाची चौकशीही केली.
पोलीस उपायुक्त अजय लांबा म्हणाले, येत्या चार दिवसात म्हणजे ३० ऑगस्टपूर्वी आसाराम बापूंना चौकशीला हजर राहण्यासंदर्भातील सुचनापत्र देण्यात आले आहे. त्यानुसार आसाराम बापूंची सदर प्रकरणावरून चौकशी केली जाईल. त्यानंतरच तपासाला योग्य दिशा मिळेल

 

Story img Loader