बलात्कार प्रकरणामुळे कथित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू हे सध्या तुरुंगात असले तरी राजस्थानमध्ये तिसरी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आसाराम बापू हे स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, रामकृष्ण परमहंस यांच्यासारखेच संत आहेत असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे.  एनसीईआरटी आधारित या पुस्तकामध्ये देशातील महान संतासोबत आसारामचे छायाचित्र प्रकाशित केले आहे.
दिल्लीस्थित एका प्रकाशन संस्थेने आसाराम बापूंच्या नावाचा समावेश करून नया उजाला हे पुस्तक तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केले आहे. या ४० पानी पुस्तकात आसारामबापूंचे नाव महान संतांच्या यादीत समाविष्ठ करण्यात आले आहे. आसारामबापूंचे छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले असून, या यादीत गुरूनानक, स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा आणि रामकृष्ण परमहंस या महान व्यक्तींचा समावेश आहे.
याविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी राजस्थानच्या शिक्षण विभागाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत यासंदर्भात विरोध व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांना आसाराम बापूंचे धडे देत नेमके काय साध्य करायचे आहे, विद्यार्थ्यांसमोर कोणाचा  आदर्श ठेवायचा असा संतप्त सवाल राजस्थानमधील शिक्षणप्रेमींनी उपस्थित केला आहे. या घटनेची गंभीरता लक्षात घेत राजस्थान शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान प्रकाशक राकेश अग्रवाल यांनी या पुस्तकाचा अभ्यासक्रम पाच वर्ष जुना असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा