Jodhpur : राजस्थानच्या जोधपूरमधील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. जोधपूरमधील एका रुग्णालयातील लॅब अटेंडंट कर्मचाऱ्याने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून रुग्णाचा ईसीजी केल्याचा प्रकार घडला आहे. या कर्मचाऱ्याने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून रुग्णाचा ईसीजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लॅब अटेंडंट कर्मचारी हा मोबाईलमध्ये यूट्यूबवर ईसीजीची प्रक्रिया पाहून करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
लॅब अटेंडंट कर्मचाऱ्याने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून रुग्णाचा ईसीजी करत असल्याचा प्रकार पाहून रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या कर्मचाऱ्याला रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी असे न करण्याची विनंती केली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्टीमुळे रुग्णालयामध्ये एकही डॉक्टर उपस्थित नसल्याची माहिती सांगितली जात आहे. जोधपूरमधील एका रुग्णालयात ३१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून रुग्णाचा ईसीजी करत असतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीने या हॉस्पिटलमध्ये या प्रकारामध्ये नर्सिंग स्टाफचाही सहभाग असल्याचा आरोप केला आहे. तसेच या कर्मचाऱ्याने त्याला ईसीजी कसा करावा, यासंदर्भातील माहिती नसल्याची कबुली दिली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
दिवाळीमुळे कोणतेही कर्मचारी ड्युटीवर नव्हते. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना या रुग्णालयाचे अधिकारी बीएस जोधा यांनी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाटी चौकशी सुरु करण्यात आली असून या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारावाई करण्यात येईल. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.