१५ ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आणि ३१ ऑगस्टला अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतले. यानंतर जो बायडेन यांचे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून रेटिंग आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर गेले आहे. न्यूज मेरिस्ट नॅशनल पोल, एनपीआर आणि पीबीएस न्यूशोरनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची रेटिंग ४३ टक्क्यांच्या नवीन नीचांकावर घसरली आहे. ही रेटिंग त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत सर्वात कमी आहे. बायडेन यांच्या परराष्ट्र धोरण हाताळण्याची पद्धत बहुसंख्य अमेरिकन लोकांना आवडत नाहीत. अफगाणिस्तानमध्ये जे घडलं ते अमेरिकेच्या भूमिकेचं अपयश आहे, असं मोठ्या प्रमाणात अमेरिकन लोकांनी म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जो बायडेन यांची रेटिंग सध्या ४३ टक्क्यांवर आहे. तर सुमारे ५६ टक्के अमेरिकन लोकांनी बायडेन यांची परराष्ट्र धोरण हाताळण्याची पद्धत नापसंत केली आहे. अमेरिकेतील सुमारे ६१ टक्के लोक अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने घेतलेल्या माघारीच्या विरोधात आहे, असे मॅरिस्ट पोलने प्रकाशित केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानात नेमकं काय व्हायला पाहिजे याबद्दल अमेरिकन लोकांना खात्री नसली तरी,  सुमारे ७१ टक्के लोकांना अमेरिकेची भूमिका अपयशी ठरली असे वाटत आहे, असे सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

ज्या ७१ टक्के लोकांनी अमेरिका अपयशी ठरल्याचं म्हटलंय त्यामध्ये ७३ टक्के रिपब्लिकनसह ६६ टक्के डेमोक्रॅट्सचाही समावेश आहे. यामध्ये बायडेन यांच्या स्वत: च्या पक्षाचे सहकारी देखील त्यांच्यासोबत सहमत नाहीत. यामध्ये ७५ टक्के स्वतंत्र राजकारण्यांचाही समावेश आहे. ६१ टक्के अमेरिकन लोकांना असं वाटतंय की अफगाणिस्तानने अमेरिकेच्या मदतीशिवाय आपले भविष्य निश्चित केले पाहिजे, तर युद्धजन्य देशासोबत उभं राहणं हे अमेरिकेचं  कर्तव्य आहे, असं २९ टक्के लोकांना वाटतंय.

अमेरिकेने अफगाणिस्तानची परिस्थिती कशी हाताळायला हवी होती, या प्रश्नावर अमेरिकन लोकांमध्ये मतमतांतरे आहेत. ३७ टक्के लोकांना वाटतंय की अमेरिकन सैन्य पूर्णपणे मागे घ्यायला पाहिजे, तर ३८ टक्के लोक म्हणतात की काही सैन्य माघारी घेऊन काही सैन्य अफगाणिस्तानमध्ये ठेवायला पाहिजे. १० लोकांच्या मते अमेरिकन सैन्याने माघारी परतू नये, तर ५ टक्के लोकांना वाटतं की अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जास्त सैन्य पाठवावं.

शेवटी सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की अफगाणिस्तानमधील परिस्थितीची जबाबदारी फक्त बायडेनवर आहे, असं अमेरिकन लोकांना वाटत नाही. मतदान झालेल्या सर्वांपैकी ३६ टक्के लोकांनी जॉर्ज डब्ल्यू बुश यांना लष्करी मोहिमेच्या अपयशासाठी सर्वात जास्त जबाबदार ठरवले. त्यानंतर २१ टक्के लोकांनी बायडेन, १५ टक्के लोकांनी बराक ओबामा आणि १२ टक्के लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलं. डेमोक्रॅट्स लोक बुश ५३ टक्के आणि ट्रम्प यांना २२ टक्क्यांसह सर्वात जास्त जबाबदार धरतात. तर, रिपब्लिकन डेमोक्रॅट्स बायडेन ३८ टक्के आणि बराक ओबामा ३४ टक्के यांना सर्वाधिक जबाबदार धरतात.