अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला परत बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आमच्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर निर्माण झाली, अशी कबुलीही बायडेन यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हाइट हाऊसमधील इस्ट रुममधून बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी यांचं सरकार पडून तालिबानच्या हातात संपूर्ण देश गेल्यानंतर बायडेन यांचं हे पहिलं भाषण होतं. बायडेन यांनी सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी अफगाणी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. अफगाणी नेत्यांनी संघर्ष न करता हार मानली आणि देश सोडून पळून गेल्याचं मत बायडेन यांनी व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> अफगाणिस्तान : देशात अराजकता… मात्र महिलांसंदर्भातील ‘या’ एका उद्योगाला आले सुगीचे दिवस

“मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. २० वर्षानंतर मला एक गोष्ट समजली की अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कर परत बोलवण्यासाठी योग्य अशी कोणतीच वेळ नव्हती. यामागील धोक्याची आम्हाला जाणीव होती. मात्र खरं सांगायचं झाल्यास सर्व घटना या आम्हाला अपेक्षित होतं त्यापेक्षाही अल्पावधीत घडल्या. तर तिथे झालं काय यासंदर्भात बोलायचं झाल्यास अफगाणिस्तानमधील राजकीय नेत्यांनी लवकर हार मानली आणि ते देश सोडून पळून गेले. अफगाणिस्तानचं लष्करही कोलमडलं,” असं बायडेन यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> लोकल ट्रेनप्रमाणे एकाच वेळी अनेकांचा विमानात चढण्याचा प्रयत्न; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

रविवारी अफगाणिस्तानमधील सरकार पडलं. अध्यक्ष घनी हे देश सोडून पळून गेले. तालिबानने काबूल या राजधानीच्या शहरावर ताबा मिळवला आणि संपूर्ण देश तालिबानच्या ताब्यात गेला. बायडेन हे खास या भाषणासाठी वॉशिंग्टनला आले आहेत. अमेरिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर देशाच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात बायडेन यांच्यासाठी हा काळ कसोटीचा ठरणार आहे.

नक्की पाहा >> Video : तालिबानने ISIS आणि ‘अल-कायदा’च्या ५ हजार दहशतवाद्यांना तुरुंगातून दिलं सोडून

अफगाणिस्तानमधून लष्कर मागे बोलवण्याच्या बायडेन यांच्या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका झाली तरी त्यांच्या निर्णयावर कायम राहिले. आता अमेरिकेने अफगाणिस्तानमधील विमानतळांवर पुन्हा सैन्य पाठवण्याची तयारी केल्याने अमेरिकेच्या निर्णयांमध्ये संभ्रम दिसत असल्याची टीका केली जात आहे. अनेक देशांनी अफगाणिस्तानमधून आपल्या दुतावासातील नागरिकांना परत बोलावलं आहे.

नक्की वाचा >> “…अन् त्यांनी देश विकला”; देशातून पलायन केलेल्या अफगाणी राष्ट्राध्यक्षांवर संरक्षण मंत्र्यांचे गंभीर आरोप

कालपासून काबूल विमानतळावर हजारो लोकांनी गर्दी केली असून हजारो लोक तालिबानच्या भीतीने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्नात आहेत.