Joe Biden Farewell Speech : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जो बायडेन यांनी आज शेवटचे राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी आपल्या ओव्हल कार्यालयातून आपले निरोपाचे भाषणे केले. यावेळी त्यांनी देशातील ‘शुपर रिच क्लास’ लोकांवर टीका केली. बायडन म्हणाले की, समाजात काही मोजक्या लोकांकडे सत्तेचे केंद्रीकरण (oligarchy) धोकादायक पद्धतीने होत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे पुढच्या पाच दिवसांच्या आत व्हाईट हाऊसमधून बाहेर पडणार आहेत. यादरम्यान आपल्या निरोपाच्या भाषणात जो बायडन म्हणाले की, मी देशातील काही धोक्यांबद्दल सावध करू इच्छितो, जे भविष्यात मोठा धोका ठरू शकतात. आज शक्ती मुठभर लोकांच्या हातांमध्ये एकवटली आहे. मोजक्या अतिश्रीमंत लोकांकडे शक्तीचे केंद्रीकरण धोकादायक आहे, ज्यामध्ये देशातील लोकशाहीला देखील धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांनाही धोका आहे, यामुळे भविष्यात सर्वांसाठी असलेल्या समान संधी देखील संपून जातील.
बायडेन पुढे म्हणाले की, देशाला त्यांच्या तावडीतून बाहेर काढावे लागेल. अमेरिका असण्याचा अर्थच हा आहे की सर्वांना समान संधी मिळेल. मात्र तुम्ही मेहनत करणे सोडून नका करण तुमची मेहनतच तुम्हाला पुढे घेऊन जाईल.
बायडेन म्हणाले की आजच्या काळात मोठी अडचण चुकीची माहिती आणि योग्य माहितीचा अभाव हीच आहे. आज माध्यमांवर मोठा दबाव आहे. स्वतंत्र मीडिया संपला आहे, संपादक गायब होत आहेत.
पुढे बोलताना बायडेन म्हणाले की, मी नेहमी विचार करत आलो आहे की आपण कोन आहोत आणि आपण काय बनले पाहिजे? बायडन यांनी न्यूयॉर्क येथील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा उल्लेख करत या मूर्तीप्रमाणे अमेरिका हा विचार फक्त एका व्यक्तीच्या डोक्यातून आलेली कल्पना नाही, तर तो संपूर्ण जगातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांनी तो घडवला आहे असेही बायडन म्हणाले.
बायडेन म्हणाले की, अमेरिकेचा अर्थ लोकशाही संस्थांचा सन्मान करणे हा आहे. सुमारे ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर मी सांगू शकतो की अमेरिका असण्याच अर्थ हा लोकशाहीचा सन्मान करणे हा आहे. स्वतंत्र समाज आणि स्वतंत्र प्रेस याची आधार आहे. शक्ती आणि कर्तव्य यांचे संतुलन राखणे हे कायम शक्य होऊ शकत नाही पण जवळपास २५० वर्षांपासून यामुळेच आपली लोकशाही मजबूत होत आली आहे.
बायडेन यांनी आपल्या भाषणात त्यांच्या सरकारच्या काळातील काही कामांचा देखील उल्लेख केला. आपण इतके वर्ष एकत्रित येऊन काय केलं आहे, याचा काय प्रभाव पडला हे लक्षात येण्यासाठी अजून वेळ लागेल. पण आम्ही जी बीजं पेरली आहेत, ते विशाल वृक्ष होतील आणि अनेक शतके त्यांचे फायदे होतील. नाटोची शक्ती आणखी वाढवणे, गन सेफ्टी कायदा लागू करणे आणि वृद्धांसाठी औषधांच्या किमती कमी करणे या आमच्या सरकारच्या काही उपलब्धी आहेत, असेही बायडेन म्हणाले.
बायडेन यांनी ओव्हल ऑफिसमधून अध्यक्ष म्हणून पाचवे आणि अखेरचे भाषण दिले. यापूर्वी २४ जुलै रोजी याच कार्यालयातून त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याची घोषणा केली होती.