युक्रेनविरोधात युद्ध पुकारणारे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कठोर शब्दात टीका केलीय. त्याचबरोबरच बायडेन यांनी अमेरिकन सैन्य प्रत्यक्षात रशियाविरोधात लढणार की नाही यासंदर्भातील शक्यतांवरही भाष्य करत चर्चांना पूर्णविराम दिलाय. राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्याच स्टेट ऑफ युनियन अॅड्रेसच्या भाषणामध्ये बायडेन यांनी पुतिन यांच्या जोरदार टीका केली मात्र त्याचवेळी युक्रेनच्या जनतेसोबत आम्ही असल्याचं सांगत त्यांनी प्रत्यक्ष युद्धामध्ये अमेरिका उतरणार की नाही याबद्दलही भाष्य केलंय. रशियाने युक्रेनविरोधातील युद्धाची घोषणा करुन एक आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र कोणत्याही देशाने युक्रेनमध्ये सैन्य पाठवलेलं नाही.
नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा