अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मी योग्य आहेच. शिवाय फक्त देवच मला दुसऱ्यांदा शर्यतीत येण्यापासून थांबवू शकतो. जो बायडेन यांनी त्यांच्या टीकाकारांना हे उत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी या चर्चा सुरु झाल्या होत्या की आता जो बायडन हे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार नसतील कारण त्यांची ती क्षमता नाही. मात्र आपल्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना बायडेन यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे जो बायडेन यांनी?

जो बायडेन यांनी नुकतीच एबीसी न्यूजला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज झालो आहे असं म्हटलं आहे. ज्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही आता तेवढे सक्षम नाहीत असं तुमचे विरोधक म्हणत आहेत. यावर जो बायडेन चटकन म्हणाले, “राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्यापासून आता फक्त देवच मला थांबवू शकतो आणि तो काही खाली उतरणार नाही.” बायडन यांनी स्वतः हे सिद्ध करुन दाखवावं की ते राष्ट्राध्यक्षपदासाठी फिट आहेत अशी मागणी होते आहे. तसंच त्यांच्यावर टीकाही मोठ्या प्रमाणावर होते आहे. मात्र एका वाक्यात त्यांनी विरोध करणाऱ्यांचा विषय संपवला आहे.

Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Amit Deshmukh On Nana Patole
Amit Deshmukh : विधानसभेतील अपयशानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात बदल होणार? ‘या’ नेत्याने स्पष्ट सांगितलं
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

मी रोज कॉग्निटिव्ह टेस्ट देतो

जॉर्ज स्टीफनोपॉल्स यांनी जो बायडन यांना कॉग्निटिव्ह टेस्टबाबत विचारलं तेव्हा बायडेन म्हणाले, “मी रोज कॉग्निटिव्ह टेस्ट देतो. मी जे निर्णय घेतो ती माझी टेस्टच आहे.” असं म्हणत जो बायडन यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या काही पदाधिकारी आणि पार्टी डोनर्सच्या इच्छांवर बोळा फिरवला आहे. या सगळ्यांचं हे म्हणणं होतं की जो बायडेन यांनी आता राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडलं पाहिजे कारण ते ८१ वर्षांचे आहेत. मात्र जो बायडेन यांनी आपण अजूनही स्पर्धेत आहोत हेच अधोरेखित केलं आहे.

हे पण वाचा- विश्लेषण : कमला हॅरिस जो बायडेन यांची जागा घेऊ शकतील का? डेमोक्रॅटिक पक्षात त्यांच्या नावाला का मिळतेय वाढती पसंती?

डोनाल्ड ट्रंप यांना टोला

“अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यास माझ्यापेक्षा कुणीही लायक उमेदवार मला दिसत नाही. समोर कुणीही असूद्या मला हरवणं कठीण आहे. मी पुन्हा एकदा या पदावर विराजमान होईन याचा विश्वास मला आहे” असंही जो बायडेन यांनी म्हटलं आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांना हा टोला लगावला आहे. मागच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रंप यांच्याशी झालेल्या वाद-विवादात मला नीट भूमिका मांडता आली नाही कारण मी सर्दीने त्रस्त होतो, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रंप यांच्याशी झालेल्या वादविवादात बायडेन नीट बाजू मांडू शकले नाहीत. त्यामुळेच त्यांनी आता राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीतून बाहेर पडावं अशी चर्चा सुरु झाली होती. तसंच त्यांचे टीकाकार त्यांच्या विरोधात बोलत होते. मात्र मी सक्षम आहे, मी आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित आहे तसंच मी या रेसमधून बाहेर पडणार नाही, उगाचच कुणीही ती स्वप्नं पाहू नयेत. असं जो बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे.

Story img Loader