१७व्या जी२० परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह G20 गटातील सर्व राष्ट्रांचे प्रमुख बालीमध्ये उपस्थित आहेत. आज G20 गटातील राष्ट्रप्रमुखांनी बालीमधील खारफुटीच्या जंगलाला भेट दिली. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘सॅल्यूट’ केल्याचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच जो बायडेन यांनी ‘सॅल्यूट’ केल्यानंतर मोदींनीही त्यांना प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – भारताची ऊर्जासुरक्षा जगासाठी महत्त्वाची; जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ठाम प्रतिपादन

pm narendra modi interacted online with around one lakh booth chiefs
मतदारांशी प्रेमाने संवाद साधा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील बूथप्रमुखांना अनेक सूचना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dharashiv vidhan sabha election 2024
आपल्या भविष्याचा विचार करणार्‍याच्या पाठीशी उभे रहा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आवाहन
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर
Thackeray said Modi being Vishwaguru cant avoid mentioning his name
मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला

हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीविरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, हा संदेश देण्यासाठी आज G20 गटातील सर्व राष्ट्रांचे प्रमुखांनी बालीमधील खारफुटीच्या जंगलाला भेट देत याठिकाणी वृक्षारोपण केले.

दरम्यान, काल पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन यांच्या भेटीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. G20 परिषद सुरू होण्यापूर्वी परिषदेच्या ठिकाणी बायडेन दाखल होताच आपल्या जागेवर जाण्यापूर्वी ते थेट मोदींच्या दिशेने गेल्याचे दिसून आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून एकमेकांची गळाभेटही घेतली होती. त्यानंतर बायडेन पुन्हा वळून मोदींकडे आले आणि त्यांनी मोदींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. यावेळी मोदींनीही त्यांना काहीतरी सांगितल्यानंतर दोन्ही नेत्यांनी त्यावर दिलखुलास हसत एकमेकांना दाद दिली होती.

हेही वाचा – G20 Summit: परिषदेत आलेले जो बायडेन थेट मोदींच्या दिशेने, हस्तांदोलन आणि गुजगोष्टी; व्हिडीओ व्हायरल!

मागील काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या अनेक घडामोडींमुळे यंदा होणारी G20 परिषद महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे.