अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत करोना झाला आहे. एक्स अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली. तसंच व्हाइट हाऊसचे सचिव कॅरन जीन पियरे यांनीही अमेरिकेतील नागरिकांना जो बायडन यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. बायडेन म्हणाले, “आज दुपारी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र अमेरिकेच्या लोकांसाठी माझं काम सुरु राहिल.”

जो बायडेन यांच्या डॉक्टरांनी काय म्हटलं आहे?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे डॉक्टर केविन ओ कॉनर यांनी सांगितलं की जो बायडेन यांच्यात करोनाची काही सौम्य लक्षणं दिसत आहेत. त्यांना सर्दी आणि खोकला झाला आहे. तसंच त्यांना बराच थकवाही जाणवतो आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर आम्ही त्यांना अँटी व्हायरल डोस पॅक्सलोव्हिड दिला आहे. सध्या त्यांची प्रकृती बरी आहे. व्हाइट हाऊसनेही याबद्दल माहिती दिली आहे असं डॉक्टर म्हणाले.

Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

हे पण वाचा- बायडेन निवडणूक लढवण्यावर ठाम… डेमोक्रॅट देणगीदार, हितचिंतकांना मात्र फुटतोय घाम… काय होणार?

जो बायडेन यांना करोनाची सौम्य लक्षणं

लास वेगास युनिडोसयूएस येथील संमेलनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन भाषण करणार होते. त्याआधी त्यांची करोना चाचणी करण्यात आली. ज्यानंतर त्यांना करोना झाल्याचा अहवाल आला. सध्या त्यांना करोनाची सौम्य लक्षणं आहेत. व्हाइट हाऊसचे सचिव पियरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष बायडेन आता डेलावेयरला परतणार आहेत आणि तिथे ते होम क्वारंटाइन असतील. त्यांनी सोशल मीडियावर अमेरिकेतील नागरिकांना उद्देशून पोस्ट लिहिली आहे.

काय म्हटलं आहे बायडेन यांनी?

“माझी करोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. मात्र मी फार आजारी आहे असं मला वाटत नाही. मला आता ठीक वाटतं आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या शुभेच्छा माझ्यासह आहेत. मला लवकरच बरं वाटेल याची मला खात्री आहे. तसंच मी सध्या स्वतःला क्वारंटाइन करतो आहे, मात्र अमेरिकेतल्या नागरिकांसाठी जी कामं करायची आहेत ती मी करत राहणार आहे.”

Joe Biden Corona Positive
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना करोना झाला आहे.

७ जुलैच्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली पाहिजे अशी चर्चा रंगली होती. या सगळ्यांना उत्तर देत राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीपासून मला केवळ परमेश्वर थांबवू शकतो आणि तो काही खाली येणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळेही बायडेन यांची चर्चा झाली होती. “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यास माझ्यापेक्षा कुणीही लायक उमेदवार मला दिसत नाही. समोर कुणीही असूद्या मला हरवणं कठीण आहे. मी पुन्हा एकदा या पदावर विराजमान होईन याचा विश्वास मला आहे” असंही जो बायडेन यांनी म्हटलं होतं. आता निवडणुकीच्या ऐन धामधुमीत त्यांना करोना झाला आहे.

Story img Loader