Jammu Sumedha Sharma Murder : जम्मूमध्ये दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्याकांडची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. येथील एका महिला डॉक्टरला तिच्या प्रियकराने चाकूने भोसकून मारून टाकलं आहे. तरुणाने आपल्या प्रेयसीच्या खुनानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी मृत महिलेची ओळख डॉ. सुमेधा शर्मा अशी सांगितली आहे. तिच्या वडिलांचं नाव कमल किशोर शर्मा असं आहे. सुमेधा ही तालाबा तिल्लो (जम्मू) येथील रहिवासी होती. तर तिचा खून करणारा आरोपी हा डोडा जिल्ह्यातील भद्रवाह गावचा रहिवासी असून त्याचं नाव जौहर गनई असं आहे. त्याच्या वडिलांचं नाव महमूद गनई असं सांगण्यात येतंय. त्याचं कुटुंब सध्या पंपोश कॉलोनी येथे राहात आहे.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
bjp leader and mlc yogesh tilekar uncle satish wagh killed after kidnapped in pune
भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून

आरोपीवर जम्मूतल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

या घटनेची माहिती मिळताच पोलीस जौहरच्या जानीपूर येथील घरी पोहोचली. त्याच्या घराचं गेट बंद होतं. त्यानंतर पोलीस आत शिरले. तेव्हा तिथे डॉक्टर सुमेधाचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला आढळला. तर आरोपी जौहरच्या शरीरावर जखमेच्या खुना होत्या. यानंतर पोलिसांनी जखमी जौहरला रुग्णालयात दाखल केलं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी सुमेधाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या हवाली केला. तर आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Love Jihad : “मंगलप्रभात लोढांनी माफी मागावी”, अबू आझमींची मागणी, गुलाबराव म्हणाले “माझ्या गावी चला…”

आधी हत्या मग आत्महत्येचा प्रयत्न

मृत सुमेधा शर्मा आणि आरोपी जौहर यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांनी जम्मूमधल्या दंत महाविद्यालयातून बीडीएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं. सुमेधा सध्या जम्मू-काश्मीरच्या बाहेर असलेल्या एका कॉलेजमध्ये एमडीएसची तयारी करत होती. होळीनिमित्त ती तिच्या घरी आली होती. ७ मार्च रोजी ती तिचा बॉयफ्रेंड जौहरला भेटायला जानीपूर येथे गेली. तिथे दोघांमध्ये भांडण झालं. यावेळी जौहरने किचनमधील चाकूने भोसकून सुमेधाची हत्या केली. त्यानंतर त्याच चाकूने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी तो जखमी झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader