पीटीआय, जम्मू : देशाच्या तिन्ही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांची ‘जॉईन्ट थिएटर कमांड’ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली. त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणारा देश ही ओळख पुसत भारताची वाटचाल ही सर्वाधिक शस्त्रनिर्यात करणारा देश होण्याकडे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

  देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जम्मूतील गुलशन मैदानावर जम्मू काश्मीर पीपल्स फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संरक्षणमंत्री म्हणाले की, कारगिरमधील ऑपरेशन विजय अंतर्गत झालेल्या संयुक्त मोहिमा लक्षात घेता देशात जॉईन्ट थिएटर कमांडची संकल्पना राबविली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.