देशभक्तीच्या मुद्द्यावरून पत्रकार राजदीप सरदेसाई आणि अभिनेता अनुपम खेर यांच्यात गेल्या काही दिवसांत ट्विटरयुद्ध रंगलेले आहे. शिवसेनेच्या दांभिकतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राजदीप देसाई यांच्या ट्विटला अनुपम खेर यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर या सगळ्या वादाला सुरूवात झाली. काश्मिरी पंडितांच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावर बोलताना राजदीप यांची देशभक्ती कुठे जाते, असा थेट सवाल अनुपम खेर यांनी उपस्थित केला. तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तुम्ही इतक्या असंवेदनशीलप्रकारे व्यक्त होता, हे दुर्देवाचे आहे. गेल्या काही वर्षातील काश्मिरी पंडितांच्या सामुहिक हत्या आणि त्यांच्या स्थलांतराबाबत तुम्ही कोणत्याप्रकराची देशभक्ती दाखविली?. मात्र, याबाबत तुझ्याशी बोलून काही फायदा आहे का, हे म्हणजे झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला उठवण्यासारखे असल्याचा टोला अनुपम खेर यांनी राजदीप यांना लगावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा