श्रीनगरमधील रैनावारी येथे आज सकाळी झालेल्या चकमकीमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंठस्थान घालण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो पूर्वी पत्रकार म्हणून काम करायचा अशी माहिती समोर आलीय. या दहशतवाद्याचं नाव रियास अहमद भट असं असून तो अनंतनागमध्ये ‘व्हॅली न्यूज सर्व्हिस’ नावाने ऑनलाइन न्यूज पोर्टल चालवायचा. भटने मागील वर्षी ऑगस्टमध्ये लष्कर-ए-तोयबा संघटनेमध्ये शामील झालेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भट्टविरोधात दोन गुन्हे दाखल होते. दहशतवादी कारवायांशीसंबंधित दोन एफआयआर भट्टविरोधात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अशाप्रकारे एका पत्रकाराचाच दहशतवादी कारवायांमध्ये समावेश असल्याचं प्रकरण समोर आल्याचे प्रसारमाध्यमांचा चुकीचा वापर होत असल्याचं स्पष्ट होतंय असं म्हटलंय. जम्मू झोन पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये, “ठार करण्यात आलेल्या एका स्थानिक दहशतवाद्याकडे प्रसारमाध्यमांचं ओळखपत्र सापडलं आहे. यामधून मिडियाचा चुकीचा वापर केला जातोय हे स्पष्ट होतंय, असं आयजीपी म्हणालेत,” असं म्हटलंय. सोशल मीडियावरही आता हे आयकार्ड चर्चेचा विषय ठरत आहे.

याच चकमकीमध्ये ठार करण्यात आलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचं नाव हलिल अङमद रहम असं असून तो बिजबेरा येथील रहिवाशी आहे. तो सुद्धा सी दर्जाचा म्हणजेच स्थानिक तरुणांमधून दहशतवादी झालेल्यांपैकी एक होता. स्थानिकांना ठार करण्यापासून काश्मीर खोऱ्यात घडलेल्या दहशतवादी घटनांमध्ये या दोघांचाही हात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. चकमक झालेल्या ठिकाणावरुन पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त केलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist turned terrorist among two killed in srinagar encounter scsg