Premium

जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांचा मोदींना पाठिंबा, म्हणाले…

सध्याच्या सरकारने अर्थव्यवस्थेला आपल्या कार्यकालादरम्यान जोरदार चालना दिली आहे. त्यामुळे या सरकारला आणखी पाच वर्षे संधी मिळालीच पाहिजे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदल यांनी मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. “सध्याच्या सरकारने अर्थव्यवस्थेला आपल्या कार्यकाळादरम्यान जोरदार चालना दिली आहे. त्यामुळे या सरकारला आणखी पाच वर्षे संधी मिळालीच पाहिजे,” असे ट्विट जिंदल यांनी केले आहे.

सज्जन जिंदल यांनी मंगळवारी दोन ट्विट केले आहेत.  “सध्याच्या सरकारने अर्थव्यवस्थेला आपल्या कार्यकाळादरम्यान जोरदार चालना दिली आहे. त्यामुळे या सरकारला आणखी पाच वर्षे संधी मिळालीच पाहिजे. एक्झिट पोलमुळे सेन्सेक्सला गेल्या १० वर्षांमधील सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली. यातून केंद्रातील विद्यमान नेतृत्वाखालीच अर्थव्यस्थेची विकासाकडे वाटचाल होईल हे स्पष्ट होते”, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

सज्जन जिंदल यांनी या ट्विटमध्ये मोदींचा थेट उल्लेख करणे टाळले असले तरी याद्वारे मोदी सरकारला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. सज्जन जिंदल हे जेएसडब्ल्यू समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. यापूर्वीही त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना मोदींना पाठिंबा दर्शवला होता.
“सुरुवातीला मोदी सरकार पुन्हा सहज सत्ता मिळवेल, असा अंदाज होता. मात्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमधील निकाल पाहता मोदी सरकारसाठी कठीण परिस्थिती असल्याचे दिसते. पण मोदी सरकारला दुसऱ्यांदा संधी मिळालीच पाहिजे. सरकारला पहिल्या टर्ममध्ये जे काम करता आले नाही ते काम दुसऱ्या टर्ममध्ये पूर्ण करता येईल”, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jsw md sajjan jindal supports pm narendra modi leadership says government deserves second term

First published on: 21-05-2019 at 16:22 IST

संबंधित बातम्या