जमाद-उद-दावा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने ‘फॅण्टम’ चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. हाफिज सईदने लाहोर येथील उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे.
हाफीज सईदने आपले वकील ए. के. डोगर यांच्यामार्फत लाहोर उच्च न्यायालयात चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. ‘फॅन्टम’ चित्रपटात पाकिस्तानविरोधात दाखवण्यात आले असल्याचा आरोप हाफिज सईदने केला आहे. चित्रपटात जमात-उद-दावा संघटनेविरोधात हिंसक दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सैफ अली खानचा ‘फॅन्टम’ चित्रपट २६/११ च्या मुंबई हल्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या माध्यमातून पाकिस्तानचा अपप्रचार करण्यात आला आहे, असे सईदचे म्हणणे आहे.
‘फॅण्टम’ चित्रपटावर बंदी आणण्याची हाफिज सईदची मागणी
जमाद-उद-दावा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने 'फॅण्टम' चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. हाफिज सईदने लाहोर येथील उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे.
First published on: 09-08-2015 at 11:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jud chief hafiz saeed wants ban on saifs phantom in pakistan