गुजरातमधील मुस्लिमांपेक्षा पाकिस्तानातील हिंदू अधिक सुरक्षित असल्याच्या आशयाचे ट्विट ‘जमात उद दवा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी हाफीज सईद याने केले आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी सईद यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला आहे.
सईद याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांसोबत काहीही केले असले, तरी पाकिस्तानातील हिंदूंचे जीवन आणि त्यांचा सन्मान कायम सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी सईद यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानातील हिंदू कशा पद्धतीचे जीवन जगताहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. हिंदू मुली आणि कुटुंबियांना तिथे सातत्याने लक्ष्य करण्यात येते आहे. हाफिज सईद यांचे राजकारण त्यावरच बेतलेले असल्याचेही रविशंकर प्रसाद म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा