पीटीआय, नवी दिल्ली

दिल्लीमधील जुन्या राजेंद्रनगर भागात शनिवारी झालेल्या दुर्घटनाप्रकरणी, दिल्ली न्यायालयाने पाच जणांच्या जामीन अर्जावरील निकाल मंगळवारी राखीव ठेवला. राव आयएएस स्टडी सर्कलच्या तळघरामध्ये पावसाचे पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्या प्रकरणी एका एसयूव्हीचालकासह तळघराच्या चार मालकांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली, त्यावेळी बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत निकाल राखीव ठेवत असल्याचे न्यायदंडाधिकारी विनोद कुमार यांनी जाहीर केले.

Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
high court order railway administration
गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू, पालकांना चार लाख रुपये नुकसाभरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
Financial fraud , students , educational institution,
ठाण्यात शैक्षणिक संस्थेकडून २०० हून अधिक विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक

एसयूव्हीचालक मनुज कथुरिया याला झालेली अटक बेकायदा असल्याचा त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. त्याने पावसाचे पाणी साचलेल्या रस्त्यावर वाहन चालवल्यामुळे पाण्याचा फुगवटा होऊन ते पाणी तळघरात शिरल्याचा पोलिसांचा आरोप आहे. मात्र, आपल्याला विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल काहीही माहिती नव्हती किंवा तसा हेतूही नव्हता असे कथुरियाने सांगितले आहे. त्याचे वकील राकेश मल्होत्रा यांनी विचारले की, ‘‘या दुर्दैवी घटनेचे कारण काय आहे? अन्य कारणासाठी असलेल्या तळघरात वाचनालय चालवणे हे की, दिल्ली महापालिका, दिल्ली जल बोर्ड यांना पाणी साचणे टाळण्यात आलेले अपयश?’’ दिल्ली न्यायालयाने सोमवारी कथुरियासह तेजिंदर सिंग, परविंदर सिंग, हरविंदर सिंग आणि सरबजीत सिंग या तळघराच्या सहमालकांना १२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Story img Loader