13 year girl Sadhvi in maha kumbh: सोमवार (दि. १३ जानेवारी) पासून उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभ मेळ्याची सुरुवात होत आहे. पण त्याआधीच ‘जुना आखाडा’ या सर्वात मोठ्या आखाड्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या आखाड्यात एका १३ वर्षांच्या मुलीला साध्वी बनण्याची दीक्षा देण्यात आली होती. हे नियमबाह्य असल्याचे सांगत आखाड्याने सदर महंत कौशल गिरी यांना ७ वर्षांसाठी बाहेर काढले आहे. तसेच साध्वी झालेल्या मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे. तसेच त्यांना महाकुंभ मेळ्याच्या बाहेर जाण्यास सांगितले आहे. तसेच आखाड्याने बैठक घेऊन आता नियमावलीही तयार केली आहे. महिलांना जर संन्यासी व्हायचे असेल तर त्यांनी वयाची २२ वर्ष पूर्ण केलेली असावीत, असा नियम करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कौशल गिरी यांनी सांगितले होते की, सदर मुलीच्या इच्छेनंतर तिच्या पालकांनीच तिला आखाड्याच्या स्वाधीन केले होते. मुलीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिच्या पालकांची हरकत नव्हती. धर्मध्वज आणि पिंडदान सारख्या विधी झाल्यानंतर तिचा संन्यासी होण्याचा प्रवास सुरू होणार होता. मात्र या घटनेनंतर जुना आखाड्यातील ज्येष्ठ संतांनी चिंता व्यक्त केली. नैतिकता आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करून ज्येष्ठ संतांनी कौशल गिरी यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा >> महाकुंभ मेळ्यामध्ये साध्वी होणार IAS अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी मुलगी; चर्चेत असलेली राखी सिंह कोण आहे?

जुना आखाड्याचे प्रवक्ते नारायण गिरी म्हणाले की, सदर मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिचा संन्यासी होण्याचा निर्णय मान्य करता येणार नाही. त्यामुळेच तिला घरी परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे २२ वयाहून कमी वय असलेल्या महिलांना संन्यासी केले जाणार नाही. हा निर्णय घेण्यासाठी सदर व्यक्तीमध्ये परिपक्वता येणे गरजेचे आहे. मुलांना आमच्या संकुलात प्रवेश दिला जाऊ शकत नाही. त्यामुळेच आम्ही यापुढे अशा घटना घडणार नाहीत, असे निर्देश दिले आहेत.

अल्पवयीन मुलगी कोण आहे?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलीच्या वडिलांचे आग्रा येथे मिठाईचे दुकान आहे. २६ डिसेंबर रोजी वडील आपल्या दोन मुलींसह प्रयागराज येथे आले. कौशल गिरी यांच्या ओळखीने ते सेक्टर २० मधील जुना आखाड्याच्या संकुलात वास्तव्यास होते. या मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी या कुटुंबाचा संपर्क कौशल गिरी यांच्याशी झाला. तेव्हापासून हे कुटुंब कौशल गिरी यांच्यावर श्रद्धा ठेवून आहे.

महाकुंभ मेळा

प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाकुंभ जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम आहे. या मेळाव्यासाठी जगभरातून भाविक येतात. यंदाचा मेळा नदीकाठच्या ४००० हेलटर क्षेत्रावर होणार आहे. दर १२ वर्षांनी प्रयागराज मध्ये पूर्ण कुंभ मेळा आयोजित केला जातो, तसेच प्रयगराजमध्ये १४४ वर्षांनी आयोजित होणाऱ्या कुंभला महाकुंभ मेळा म्हणतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juna akhara expels mahant for accepting 13 years girl as donation kvg