लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या कनिष्ठ वकिलांना योग्य पगार द्यावा. ते वरिष्ठ वकिलांचे गुलाम नाहीत. वकिली करणे हे या क्षेत्रातील फक्त वरिष्ठांचेच काम नाही, असे प्रतिपादन सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले. सरन्यायाधीशपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडून चंद्रचूड यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा >> वीर सावरकरांवरील वक्तव्यानंतर राज्यात संताप, आता राहुल गांधींचा थेट संजय राऊतांना फोन, कोणत्या विषयांवर चर्चा?
“एखादा कनिष्ठ वकील दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू या शहरात राहात असेल तर त्याला चरितार्थासाठी बरेच पैसे लागतात. अशा शहरांत खोली भाडे, प्रवास, जेवण असा सारा खर्च असतो. असे किती वरिष्ठ वकील आहेत, जे आपल्यासोबत काम करणाऱ्या कनिष्ठ वकिलांना योग्य पगार देतात. काही तरुण वकिलांकडे तर त्यांचे स्वत:चे चेंबरदेखील नाही, ” असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.
हेही वाचा >> फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?” संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “समर्थन करण्यापेक्षा…”
“वकिली क्षेत्रात फार असमानता आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाकडे सात ते आठ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग स्क्रीन असतात. माऊसच्या एका क्लीकवर एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात जाण्याची त्यांच्याकडे सोय असते. तर दुसरीकडे असे काही वकील आहेत, जे करोना महासाथीच्या काळात संटकात सापडले होते. वकिली हे क्षेत्र वरिष्ठ लोकांचा क्लब आहे. येथे फक्त एकाच समूहातील लोकांना संधी मिळते. हे चित्र बदलायला हवे, असेही सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.