Junior Doctor’s Death in kolkata : गेल्या काही दिवसांपासून देशभरात हत्या आणि बलात्काराच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. आता कोलकात्यामध्ये आर.जे. कार राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३१ वर्षीय डॉक्टर शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. चौकशी अहवालानुसार, रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. तर मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेमुळे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सखोल चौकशीच्या मागणीसाठी अनेक डॉक्टरांनी काम बंद केले आहे. शनिवारी इतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपी संजय रॉय याला हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >> Brazil Plane Crash VIDEO : ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, विमान जळून खाक

खटला जलदगती न्यायालयात चालवणार

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ही घटना दुर्दैवी आणि निंदनीय आहे. हे मला वैयक्तिक नुकसानीसारखे वाटते. डॉक्टरांचा राग आणि मागण्या रास्त आहेत आणि मी त्याचे समर्थन करतो. मी काल झारग्राममध्ये होते, पण मी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत होते. मी पीडितेच्या कुटुंबीयांशी बोलून याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, असे मी निर्देश दिले आहेत. गरज पडल्यास आरोपींना फाशी दिली जाईल, तरीही मी फाशीच्या शिक्षेची समर्थक नाही. पण त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

चौकशीसाठी दोन समिती स्थापन करणार

मृत डॉक्टरच्या वडिलांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, आदल्या दिवशी रात्री ११ वाजता त्यांचे त्यांच्या मुलीशी बोलणे झाले होते. ती खूप सामान्य वाटत होती. मला धक्काच बसला…ती अर्धनग्न अवस्थेत पडली होती. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा आम्हाला संशय आहे.” रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर शुक्रवारी पहाटे दोन वाजेपर्यंत ड्युटीवर होते. रुग्णालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन समिती स्थापन झाले आहेत. एक अंतर्गत चौकशीसाठी आणि दुसरे पोस्टमॉर्टमसाठी ही समिती आहे.

टीएमसी नेत्याच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांना सर्वतोपरी मदत आणि पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. याव्यतिरिक्त, TMC राज्यसभा खासदार संतनु सेन यांनी “प्रकरणाची संपूर्ण आणि निष्पक्ष चौकशी” करण्याचे आश्वासन दिले. “आम्ही खात्री करू की सत्याचा विजय होईल. यामध्ये कोणीही सहभागी असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सेन म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junior doctors death half naked doctors body found in pool of blood brutal murder of a young woman in a government hospital sgk