गेल्या काही दिवसांपासून अनेक संस्थांमध्ये धमकीचे बनावट फोन किंवा मेल येण्याची प्रकरणे वाढली आहे. संबंधित बनावट मेल अथवा फोन आले की सुरक्षा यंत्रणा सक्रीय होतात आणि चौकशीअंती त्यांच्या हाती काहीच लागत नाही. कोणीतरी मनोरंजन म्हणून किंवा दारूच्या नशेत असे बनवाट फोन किंवा मेल पाठवले असल्याचे निष्पन्न होते. असाच एक प्रकार दिल्लीत झाला आहे. अवघ्या १२ वर्षाच्या मुलाने फक्त मजेकरता शाळेतच बॉम्ब असल्याचा मेल पाठवला होता.

दिल्लीतील मथुरा रोड येथील दिल्ली पब्लिक शाळेच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आला असून एप्रिल २६ रोजी सकाळी ८ वाजता हा बॉम्ब अॅक्टव्हि होईल असा मेल शाळेला प्राप्त झाला होता. या शाळेच्या मुख्यध्यापकांनी लागलीच सकाळी ७.५० मिनिटांनी या मेलची माहिती पोलिसांना कळवली. यावेळी ४ हजारांहून अधिक विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. पोलिसांचे तीन पथक, बॉम्बनाशक पथक, श्वानपथक आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी येथे तपासणी केली. परंतु, या तपासणीत यंत्रणांना काहीच आढळलं नाही. त्यामुळे ही एक अफवा असल्याचं सिद्ध झालं.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा

याप्रकरणी अधिक चौकशी केली असता या प्रकरणातील आरोपी दिल्लीतीलच असल्याचं स्पष्ट झालं. हा मेल पाठवण्याकरता अल्पवयीन विद्यार्थ्याने वेगळे सॉफ्टवेअर वापरले होते. हा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं नाही. परंतु, त्याचं समुपदेशन करण्यात आलं. समुपदेशन सत्रात पोलिसांनी विद्यार्थ्याची चौकशी केली. त्यावेळी समजलं की या मुलाने फक्त मनोरंजनासाठी या प्रँकची योजना आखली होती. दिल्लीच्याच सादिक नगर येथील दि इंडियन स्कूलमध्येही असाच प्रकार घडला होता. त्या घटनेवरून प्रभावित होऊन त्याने हा प्रकार केला. “मला फक्त मजा करायची होती”, असं हा अल्पवयीन विद्यार्थी म्हणाला.

दि इंडियन स्कूलमध्येही घडला होता असा प्रकार

गेल्या महिन्यात दि इंडियन स्कूलमध्येही असाच प्रकार घडला होता. बॉम्बशोधक पथक आणि इतर यंत्रणांनी शाळेची संपूर्ण तपासणी केली. परंतु, कोठेही बॉम्ब सापडला नाही. त्यानंतर हा बनावट मेल असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. मात्र, याप्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही.