भारताचे ४० वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. सथाशिवम यांनी शुक्रवारी शपथ घेतली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना शपथ दिली.
गेल्या नऊ महिन्यांपासून सरन्यायाधीश असलेले अल्तमास कबीर निवृत्त झाल्यामुळे सथाशिवम यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये ६४ वर्षीय सथाशिवम यांनी पदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, उपराष्ट्रपती हमीन अन्सारी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली, लालकृष्ण अडवाणी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध मंत्री उपस्थित होते.
ऑगस्ट २००७ मध्ये सथाशिवम सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते. ते २६ एप्रिल २०१४ पर्यंत पदावर कायम राहणार आहेत.

Story img Loader