लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश स्वतंत्रकुमार यांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या घटनेचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना रोखावे, अशी मागणी करणारी याचिका स्वतंत्रकुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. त्यांच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने गुरुवारपर्यंत राखून ठेवला आहे.
या घटनेचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना रोखावे, यासाठी स्वतंत्रकुमार दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यापूर्वीच दिले होते. माजी न्यायाधीशांनी मागील आठवड्यांतच ‘द इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाइम्स नाऊ’ आणि ‘सीएनएन-आयबीएन’ यांना नोटीस पाठवली होती. पीडित तरुणीने सरन्यायाधीशांना पाठविलेल्या पत्रातील माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली होती.
स्वतंत्रकुमार हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदावर कार्यरत असताना त्यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार एका तरुणीने सरन्यायाधीशांकडे केली आहे. पीडित तरुणी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत असताना तिचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लैंगिक छळ प्रकरण: न्या. स्वतंत्रकुमार यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला
त्यांच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने गुरुवारपर्यंत राखून ठेवला आहे.
First published on: 15-01-2014 at 01:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justice swatanter kumar moves delhi hc in sexual assault case