केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवीराजे सिंधियांचं निधन झालं आहे. बुधवारी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावली. आज सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधिया कुटुंबाच्या राजमाता मागच्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. माधवीराजेंवर मागच्या तीन महिन्यांपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना निमोनिया झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी केले जाणार अंत्यसंस्कार

गुरुवारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मातोश्री माधवीराजे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशीही माहिती मिळते आहे. माधवीराजे सिंधिया यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माधवीराजे नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. १९६६ मध्ये त्यांचा विवाद माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांच्याशी झाला होता. माधवीराजे यांचे आजोबा जुद्ध समशेर बहाद्दुर हे नेपाळचे पंतप्रधान होते. लग्नापूर्वी माधवीराजेंचं नाव राजलक्ष्मी असं होतं.

माधवीराजेंना सेप्सिस या आजारानेही ग्रासलं होतं

सेप्सिस या आजाराने माधवीराजेंना ग्रासलं होतं. थंडी, ताप येणं, गोंधळ उडणं, श्वास घेण्यास त्रास होणं, कमी रक्तदाब, सतत घाम येणं ही लक्षणं सामान्यतः सेप्सिस झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात. निमोनिया झाल्याने सेपिस्स होऊ शकतो तसंच रक्त संक्रमण किंवा मूत्रपिंड संक्रमणामुळेही हा आजार होऊ शकतो.

माधवीराजे सिंधिया यांचा माहेरचा इतिहासही गौरवशाली आहे. माधवीराजे सिंधियांचे आजोबा जुद्ध समशेर जंग हे नेपाळचे पंतप्रधान होते. माधवीराजे यांचं लग्नाआधीचं नाव हे राजलक्ष्मी असं होतं. माधवीराजेंचे पती आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचं २००१ मध्ये विमान अपघातात निधन झालं होतं. सिंधिया कुटुंब आणि गांधी कुटुंबात सलोख्याचे संबंध होते.

हे पण वाचा- पुणे जिल्ह्यात दुसरे विमानतळ कधी होणार? खासदार श्रीरंग बारणे यांच्या हिंदीतील प्रश्नावर ज्योतिरादित्य सिंधिया मराठीत म्हणाले…

माधवीराजे सिंधिंयांनी वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया, प्रियदर्शनी सिंधिया आणि महाआर्यमान सिंधियाही त्यांच्या बरोबर होते. त्यानंतर त्या ग्वाल्हेरमध्ये झालेल्या काही सार्वनजिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या होत्या. मागच्या तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. करोनानंतर त्यांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyotiraditya scindia mother madhavi raje passes away in delhi scj
Show comments