भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडल्यापासून राज्यातील राजकारणामध्ये हा निर्णय जातीय समिकरणांचा विचार करुन घेण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. असं असतानाच भाजपामधील काही नेत्यांनी विरोध केल्याने आणि पुन्हा ब्राह्मण मुख्यमंत्री न करता मराठा सामजातील मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा जातीय समीकरणांचे कारण देत भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहितीही समोर आलीय. याच कारणामुळे फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. राज्याच्या राजकारणामध्ये याच साऱ्या चर्चा सुरु असतानाच आता एकेकाळी काँग्रेसला अशाच प्रकार खिंडार लावणारे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही एकनाथ शिंदे मराठा असल्याचा उल्लेख करत एक महत्वाचं विधान केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील ट्विट केलंय.
नक्की पाहा >> Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण एकनाथ शिंदेंनी…
सध्या केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास थांबला होता तो आता फडणवीस आणि शिंदे जोडी पुन्हा सुरु करेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. यावेळेस बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे मराठा असल्याचही आवर्जून उल्लेख केला. “मागील अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाला महाविकास आघाडीच्या अपवित्र आघाडीमुळे खिळ बसली होती. अशावेळी मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला. मला विश्वास आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ पुन्हा महाराष्ट्रात विकास सुरु करतील,” असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा