जनता दल युनायटेड म्हणजेच जदयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पक्षाकडून दावेदारी सांगण्याचे संकेत देणारी वक्तव्य करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. जदयूचे राष्ट्रीय महासचिव के.सी. त्यागी यांनी यासंदर्भात भाष्य करताना नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्याची योग्यता आहे. मात्र ते पंतप्रधान पदाचे दावेदार नाहीत, असं स्पष्ट केलं आहे. जदयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीमध्ये राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नसले तरी त्यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण असल्याचं म्हटलं आहे. राजीव रंजन यांच्या याच वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळामध्ये सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या जदयू आणि भाजपा युतीमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर त्यागी यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यागी यांनी नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नाहीत. आमचा पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) एक मबजूत घटक पक्ष असून एनडीएचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जेडीयू ही राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत आहे, असं त्यागी म्हणालेत.
नितीश कुमार पंतप्रधान पदाचे उमेदवार?; JDU ची पहिली प्रतिक्रिया, राष्ट्रीय महासचिव म्हणाले…
जदयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार असल्याच्या चर्चा रंगल्या आणि त्यामुळे भाजपा-जदयू संबंधांबद्दलही चर्चा होऊ लागल्या.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-08-2021 at 09:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K c tyagi on nitish kumar chance of being pm candidate and jdu bjp relationship scsg