पीटीआय, बंगळूरु

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटक राज्य सरकारच्या आपल्या कामगिरीबाबतच्या जाहिराती तेलंगणमधील वृत्तपत्रांत प्रसिद्ध केल्या. मात्र, त्यामुळे कोणत्याही नियमांचे उल्लंघन होत नाही. कारण त्यात मतदानाचे आवाहन करण्यात आले नव्हते, असे स्पष्टीकरण कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. या संदर्भात निवडणूक आयोगाच्या पत्राला कर्नाटक सरकार उत्तर देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जपने सोमवारी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ३० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणमधील वृत्तपत्रांमध्ये कर्नाटक सरकारच्या जाहिराती प्रसिद्ध करून काँग्रेसने लोकप्रतिनिधी कायदा आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. आयोगाने त्याच दिवशी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला तेलंगणातील वृत्तपत्रांत आपल्या कामगिरीच्या जाहिराती प्रकाशित करणे थांबवण्याचे आदेश दिले होते. इतकेच नव्हे तर आदर्श आचारसंहितेअंतर्गत पूर्वपरवानगी न घेतल्याबद्दल आयोगाने स्पष्टीकरणही मागितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K shivakumar claim that the karnataka government advertisements did not violate the rules amy