Kailash Mansarovar Yatra to Resume from Summer 2025 : भारत आणि चीनमधील सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. अशातच दोन्ही देशांच्या या प्रयत्नांना यश मिळण्यास सुरुवात केली आहे. चीनने हा वाद सोडवण्यासाठी एक पाऊल टाकलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कैलास मानसरोवर यात्रा पु्न्हा सुरू होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्त्वतः करार झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे की भारत व चीनमधील संबंध सुधारण्यासाठी, ते अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही बाजूने योग्य पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. जून २०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही दशांमधील संबंध बिघडले आहेत. डोकलाममध्ये झालेल्या संघर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आली होती. कैलास मानसरोवर यात्रा बंद झाल्यापासून भाविक उत्तराखंडच्या व्यास खोऱ्यातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी येत होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा