मध्य प्रदेशात सत्ता राखण्यासाठी भाजपाने सगळी ताकद एकवटली आहे. पक्षाने सोमवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत तीन केंद्रीय मंत्री तसेच चार खासदार आहेत. राज्यातील काँग्रेसचं आव्हान पाहता, ज्येष्ठ नेत्यांना भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यापैकी नरेंद्रसिंह तोमर आणि फग्गनसिंह कुलस्ते हे गेल्या वेळी म्हणजेच २०१८ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या जागेवर उमेदवार आहेत. तर चारपैकी तीन खासदार हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या ठिकाणी लढत आहेत. त्याचबरोबर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनाही भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

विधानसभेचं तिकीट मिळाल्यानंतर कैलास विजयवर्गीय यांनी त्यांच्या इंदूर-१ या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ते म्हणाले, मी आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते मिळून विकासाच्या बाबतीत या विधानसभा क्षेत्राला एक नंबर बनवूया. मी तुम्हाला आश्वस्त करतो की मला जितका वेळ मिळेल तो देईन आणि मी इथे येईन.

Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
HM Shri Amit Shah addresses public meeting in Shirala
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर इच्छुक; अमित शहा
Uddhav Thackeray Buldhana, Buldhana meeting,
जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरतसह महाराष्ट्रात शिवरायांची मंदिरे उभारणार, बुलढाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे गरजले
mahayuti candidate rajendra gavit campaign rally In Palghar Assembly Constituency
मुरबे बंदर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार रॅलीला काळे झेंडे
maharashtra assembly election 2024 rohit pawar campaign for maha vikas aghadi candidate ajit gavhane in bhosari assembly constituency
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही – रोहित पवार
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट

कैलाश विजयवर्गीय म्हणाले, मी जितक्या घरांसमोर जाऊ शकतो तितक्या घरी जाण्याचा प्रयत्न करेन. परंतु, जिथे मी जाऊ शकणार नाही तिथे पोहोचण्याची जबाबदारी तुमची. या विधानसभा क्षेत्रातलं एकही घर सुटलं नाही पाहिजे. प्रत्येक घरात जा, प्रत्येक घरात तुम्ही कैलास विजयवर्गीय बनून जा. लोकांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्या. या मतदारसंघात आपला रेकॉर्डब्रेक विजय झाला पाहिजे.

भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले, खरंतर निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही. मला निवडणूक लढण्याची एक टक्कासुद्धा इच्छा नाही. आपली मानसिकता आधीच तयार झालेली असते. आम्हाला काय..जायचं आणि भाषण करायचं…आता मी मोठा नेता झालोय, हातापाया पडाययला आता कुठे जाणार?… सांगितलं जाईल तिथं जायचं, भाषण करायचं आणि निघून जायचं…मी असाच विचार केला होता..तशी योजना बनवली होती…रोज आठ सभा घ्यायच्या..पाच सभा हेलिकॉप्टरमधून आणि तीन कारमधून…परंतु तुम्ही काहीही विचार करा, पण जे ईश्वराच्या मनात आहे तेच होतं.

हे ही वाचा >> “मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागतोय”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजपा नेते म्हणाले, आता देवाला वाटतंय मी पुन्हा उमेदवार बनून जनतेत जावं. खरंतर मला विश्वास बसत नाहीये की मी निवडणूक लढतोय. मी खरं सांगतोय. मला वाटतंच नाही की मला निवडणुकीचं तिकीट मिळालंय आणि मी उमेदवार आहे.