कन्नड साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ मल्लेशप्पा कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेने गुरुवारी रामा सेने या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचा नेता प्रसाद अट्टावर याला मंगलुरूमधून ताब्यात घेतले. त्याला पुढील चौकशीसाठी बंदर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे.
प्राध्यापक कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय कर्नाटक मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी घेण्यात आला. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर अट्टावर याच्या छायाचित्रासह काही संदेश सोशल मीडियावर फिरत होते. हे संदेश कोणी तयार केले आहेत. त्याच्यामागे अट्टावर याचाच हात आहे का, याची तपासणी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रमोद मुतालिक यांच्या श्री रामा सेनेचा अट्टावर २००९ पर्यंत सदस्य होता. पण त्यानंतर त्यातून बाहेर पाडून स्वतःची नवी रामा सेनेची स्थापना केली.

Story img Loader