राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई कऱण्यात आली. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली आहे. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्म संसदेत वादग्रस्त विधाने सुरूच; गोडसेचं कौतुक करत महात्मा गांधींसाठी वापरले अपशब्द, मुख्यमंत्र्यांनी सोडला कार्यक्रम

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Aftab Poonawala, accused of Shraddha Walker's murder and dismemberment.
Lawrence Bishnoi Gang: बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर श्रद्धा वालकरचा मारेकरी; बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याची कबुली
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!

महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिव्या दिल्याप्रकरणी धर्मसंसद वादात सापडली होती. कालीचरण महाराजने या संसदेत केलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला. कालीचरण महाराजच्या अटकेच्या मागणीने यावेळी जोर धरला होता, काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. रायपूर पोलिसांनी आपले दोन गट महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कालीचरण महाराजच्या अटकेसाठी पाठवले होते.

“मला माफ करा पण मी धर्म संसदेपासून…”; महात्मा गांधींवरील वक्तव्यामुळे संतप्त रामसुंदर दास यांनी सुनावले खडे बोल

रायपूरचे पोलीस अधिक्षक प्रशांत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कालीचरण महाराज मध्य प्रदेशात खजुराहोपासून २५ किमी दूर बागेश्वर धाम येथील एका भाड्याच्या घरात राहत होता. रायपूर पोलिसांनी पहाटे चार वाजता अटकेची कारवाई केली. संध्याकाळपर्यंत पोलीस कालीचरण महाराजला घेऊन रायपूरमध्ये पोहोचतील”.

रायपूरचे माजी महापौर प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून रायपूरमधील टिकरापारा पोलिस ठाण्यात कालीचरण महाराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. IPC च्या कलम ५०५(२) [वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेष किंवा वाईट इच्छा निर्माण करणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे] आणि कलम २९४ [कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य] अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायपूरमध्ये एफआयआर दाखल होताच कालीचरण महाराज छत्तीसगडमधून पळून गेल्याची माहिती आली होती. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पथके पाठवली होती. त्यानंतर कालीचरण महाराजला रायपूरमधून अटक करण्यात आली.

हेही वाचा – VIDEO : “…म्हणून माझ्या मनात गांधींबद्दल तिरस्कार”; गुन्हा दाखल झाल्यानंतर कालीचरण महाराजांचं स्पष्टीकरण

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रायपूर धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिले होतं.

महाराष्ट्रातही गुन्हे दाखल –

महात्मा गांधींविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजविरोधात ठाणे शहरात पोलिसात तक्रार दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींसंबंधी वापरण्यात आलेल्या शब्दामुळे मला दुःख झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले. नौपाडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, धार्मिक भावना भडकावण्याच्या उद्देशाने तसेच इतर गुन्ह्यांसाठी आयपीसी कलम २९४, २९५ए, २९८, ५०५(२) आणि ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय कालीचरण महाराज मूळचा अकलो्याचा असून तिथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.