अभिनेता शाहरुख खानला भुवनेश्वर येथील कलिंगा सेनेने धमकी दिली आहे. 27 नोव्हेंबररोजी भुवनेश्वर शहरात हॉकी विश्वचषकाच्या स्वागत सोहळ्यात शाहरुख खान आपली कला सादर करणार आहे. मात्र शाहरुख भुवनेश्वरमध्ये आल्यास आम्ही त्याच्या तोंडाला काळं फासू असा इशारा कलिंगा सेनेचे महासचिव निहार पणी यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

2001 साली शाहरुख खानचा अशोका चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ओडीशातील लोकांचा अपमान केल्याचा आरोप शाहरुख खानवर ठेवण्यात आला होता. विमानतळ ते मैदानापर्यंतच्या रस्त्यावर कलिंगा सेनेचे कार्यकर्ते शाहरुखला काळे झेंडे दाखवणार आहेत. शाहरुख भुवनेश्वरमध्ये आल्यास त्याच्या तोंडाला काळं फासण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असं निहार पणी यांनी आज तक वाहिनीशी बोलताना सांगितलं.

ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शाहरुख खानला स्वागत सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आहे. मात्र कलिंगा सेनेचा शाहरुखच्या भुवनेश्वर वारीवर आक्षेप आहे. 11 नोव्हेंबर रोजी कलिंगा सेनेचे अध्यक्ष हेमंत रथ यांनी शाहरुखविरोधात पोलिस तक्रारही दाखल केली होती. यावेळी कलिंगा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाहरुखविरोधात जोरदार निदर्शनं करन त्याचा पुतळाही जाळला होता. 28 नोव्हेंबरपासून ओडीशातील भुवनेश्वर शहरात हॉकी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.