वृत्तसंस्था, न्यूयॉर्क/गॅस्टोनिया

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यामान उपाध्यक्ष कमला हॅरिस तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अखेरच्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. हॅरिस यांनी ‘सॅटरडे नाइट लाइव्ह’ या लोकप्रिय दूरचिक्रवाणी कार्यक्रमात सहभाग घेतला तर ट्रम्प यांनी उत्तर कॅरोलिना राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

‘सॅटरडे नाइट लाइव्ह’ कार्यक्रमात निवेदिका माया रडॉल्फ यांच्यासारखीच वेशभूषा करून त्यांच्या आरशातील प्रतिमेप्रमाणे भासणाऱ्या कमला हॅरिस यांचे या कार्यक्रमात सहभागी होणे त्यांच्या चाहते आणि समर्थकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. सुरुवातीलाच निवेदिका रडॉल्फ यांना उद्देशून ‘तुला भेटून आनंद झाला कमला,’ असे मिश्किल उद्गार त्यांनी काढले आणि प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळे त्यांची ही खेळी सफल होत असल्याचे मानले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamala harris and donald trump are campaigning in us presidential election amy