वॉशिंग्टन : अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाचा उमेदवार होण्यासाठी संभाव्य प्रतिस्पर्धी, काँग्रेस सदस्य आणि प्रभावशाली वकिलांच्या गटांकडून समर्थन मिळत आहे. त्यांनी आता पक्षाच्या प्रतिनिधींचे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हॅरिस यांना पहिल्या मतपत्रिकेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे नामांकन जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या १,९७६ हून अधिक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे.

हेही वाचा >>> कॅनडात खालिस्तानी समर्थकांकडून मंदिराची विटंबना; भित्तिचित्रे काढून विद्रूप करण्याचा प्रयत्न!

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ५ नोव्हेंबर रोजीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा करून हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर ५९ वर्षीय हॅरिस यांनी सोमवारी उशिरा निवेदन जाहीर करत लवकरच औपचारिकपणे नामांकन स्वीकारण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रिया दिली. १९-२२ ऑगस्टदरम्यान शिकागो येथे होणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून तत्पूर्वी अध्यक्षपदाच्या उमेदवाराला औपचारिकपणे नामनिर्देशित करण्याच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे.