हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या अभिनेत्री कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर एका अपमानजनक प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. कंगना विमानतळावर आल्या तेव्हा सीआयएसफच्या अधिकारी कुलविंदर कौर यांनी आपल्याला थोबाडीत ठेवून दिली असा आरोप कंगना रणौत यांनी केला. ज्यानंतर कुलविंदर कौर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कंगना रणौत चंदीगढ विमानतळावर पोहचल्या. त्यांना दिल्लीला जायचं होतं. त्यावेळी बोर्डिंगसाठी जात असताना ही घटना घडली. या घटनेची चांगलीच चर्चा होते आहे.
या सगळ्या घटनेनंतर कंगना रणौत दिल्लीत पोहचल्या आहेत. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीआयएसएफच्या महासंचलाक नीना सिहं यांना ही सगळी घटना सांगितली आहे. कंगना यांनी हा आरोप केलाय की चंदीगढ एअरपोर्टच्या कर्टन एरियात कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपल्याला थोबाडीत ठेवून दिली. या घटनेनंतर कुलविंदर कौर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. चंदीगढ एअरपोर्टवर असलेलं सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याची तयारी सुरु आहे.
कंगना रणौत दिल्लीला पोहचल्या आहेत. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सीआयएसफच्या महासंचलाक नीना सिंह यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. कंगना यांनी हा आरोप केला आहे की चंदीगढ एअर पोर्टच्या कर्टन एरियात कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं, त्यानंतर त्यांना थोबाडीत ठेवली. कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेजही तपासलं जातं आहे.
मंडीमधून कंगना विजयी
मंडी या मतदारसंघातून कंगना रणौत विजयी झाल्या आहेत. क्वीन, क्रिश थ्री, धाकड या चित्रपटांतून काम करणाऱ्या कंगना रणौत लवकरच इमर्जन्सी चित्रपटांत झळकणार आहेत. कंगना यांनी या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका केली आहे. तसंच गँगस्टर हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्याआधी त्या मुंबईत मॉडेलिंग करत होत्या.