पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इमर्जन्सी’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांनी निराशा व्यक्त केली आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या कालखंडावर आधारित आहे. हा प्रकार हतोत्साहित करणारा, अन्यायकारक आहे असे त्या म्हणाल्या. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख येत्या शुक्रवारी, ६ सप्टेंबर असून ती जवळ येत असतानाही अद्याप ‘सीबीएफसी’ने प्रमाणपत्र न दिल्यामुळे राणावत नाराज झाल्या आहेत.

‘‘ओटीटीवर हिंसा आणि नग्नता असलेल्या कार्यक्रमांना परवानगी मिळते पण ऐतिहासिक तथ्यांवर आधारित चित्रपटांना परवानगी मिळत नाही,’’ असे राणावत यांनी समाजमाध्यमावर लिहिले आहे. अन्य एका कार्यक्रमात बोलताना, आपल्या चित्रपटावर आणीबाणी लादली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ही फार हताश करणारी अवस्था आहे. मी आपल्याच देशात आणि येथील जे काही वातावरण आहे त्यामुळे मी अगदीच हताश झाले आहे असे कंगना यांनी म्हटले आहे. आम्ही किती घाबरायचे, मी अतिशय स्वाभिमानाने हा चित्रपट तयार केला आहे त्यामुळे त्यामध्ये ‘सीबीएफसी’ला कोणताही वाद उकरून काढता येत नाही. त्यांनी प्रमाणपत्र रोखून धरले आहे पण मी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्धार केला आहे, असे राणावत म्हणाल्या.

हेही वाचा >>>Mig 29 Fighter Jet Crashes : राजस्थानमध्ये मिग २९ लढाऊ विमान कोसळले, अपघातापूर्वीच सूचना मिळाल्याने पायलटला वाचवण्यात यश!

शिरोमणी अकाली दलाने शुक्रवारी ‘सीबीएफसी’ला ‘इमर्जन्सी’चे प्रदर्शन थांबवण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली आहे. या चित्रपटामुळे धार्मिक तणाव वाढेल आणि खोट्या माहितीचा प्रसार होईल असे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, धार्मिक प्रकरणी सरकार खबरदारी घेत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut is disappointed after the film emergency did not get censor board certification amy