Kangana Ranaut on Olympics : अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या क्रीडा उत्सवाच्या पहिल्यावहिल्या तरंगत्या उद्घाटन सोहळ्याला सेन नदीच्या पात्रात सुरुवात झाली. अत्यंत भव्यदिव्य असलेल्या या उद्घाटन सोहळ्यात जवळपास पाच लाख प्रेक्षक उपस्थित होते. दरम्यान, हा उद्घाटन सोहळा आता वादग्रस्त ठरला आहे. येथील बीभत्स प्रकारांमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला असून यावरून खासदार कंगना रणौत यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून टीका केली आहे.
पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अति लैंगिक कृत्ये दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी लहान मुलांचाही वापर करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय. ड्रॅग क्विनद्वारे दि लास्ट सपरची प्रतिकृती तयार केल्याचा दावा करून यामुळे ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचाही आरोप केला जातोय. यावरून कंगना रणौत (Kangana Ranaut on Olympics) यांनी टीका केली आहे.
हेही वाचा >> क्रीडोत्सवाला ‘सेन’दार प्रारंभ!
“द लास्ट सपरच्या अति-लैंगिक, निंदनीय सादरीकरणामध्ये एका लहान मुलाचा समावेश केल्याबद्दल पॅरिस ऑलिम्पिकवर टीका केली जात आहे. ड्रॅग क्वीनच्या सादरीकरणादरम्यान एक लहान मुलाचाही समावेश असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यांनी येशूच्या रूपात निळ्या रंगात रंगवलेला एक नग्न माणूस देखील दाखवून ख्रिश्चन समाजाचा अपमान केला आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी २०२४ चे ऑलिम्पिक पूर्णपणे हायजॅक केले आहे”, असं कंगना रणौत म्हणाल्या.
उद्घाटन समारंभातील आणखी एक फोटो शेअर करून त्यांनी म्हटलंय की हा कार्यक्रम समलैंगिकतेवर आधारीत होता. पोस्टमध्ये रणौत म्हणाल्या, “ऑलिम्पिकच्या उद्घाटन कार्यक्रमात सर्वकाही समलैंगिकतेशी संबंधित होते. मी समलैंगिकतेच्या विरोधात नाही पण ऑलिम्पिकचा लैंगिकतेशी काय संबंध? खेळ आणि स्पर्धांमध्ये लैंगिकता का आणली जाते? सेक्स बेडरुमपर्यंत मर्यादित का राहू शकत नाही?” असा संतप्त सवालही कंगना रणौत यांनी (Kangana Ranaut on Olympics) उपस्थित केला.
सोशल मीडियावरही ऑलिम्पिकच्या उद्घाटन कार्यक्रमावर टीका
नेटिझन्सनेही ऑलिम्पिकच्या या कार्यक्रमावर टीका केली आहे. ड्रॅग क्वीन्ससह लास्ट सपरचे चित्रण करताना मुलांचा वापर केल्याने नेटिझन्स संतापले आहेत. तसंच हा ख्रिश्चन समाजाचा अपमान असल्याचंही ते म्हणाले.
The 2024 Paris Olympics has gone full Woke dystopian.
— Kyle Becker (@kylenabecker) July 26, 2024
The opening ceremony was filled with transgend*r mockery of the Last Supper, the Golden Calf idol, and even the Pale Horse from the Book of Revelation.
The Olympics has made it clear that Christian viewers aren't welcome. pic.twitter.com/LgawyE6YRX
ऑलिम्पिकमध्ये ख्रिश्चन समाजाचा आदर राखला जात नाही, अशीही टीका काही नेटिझन्सने केली. (Kangana Ranaut on Olympics)