Kangana Ranaut on Farmers’ Protest: अभिनेत्री कंगना रणौत पहिल्यांदाच संसदेत खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशमधील त्यांचं वास्तव्य असणाऱ्या मंडी लोकसभा मतदारसंघातून त्या यंदाची लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांवर परखड शब्दांत टीका सुरू केली आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सीमारेषेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबाबत कंगना रणौत यांनी नुकतीच टीका करणारी भूमिका मांडली होती. त्याचे प्रतिकूल पडसाद उमटल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानं कंगना रणौत यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाल्या होत्या खासदार कंगना रणौत?

कंगना रणौत यांनी रविवारी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेतकरी आंदोलनासंदर्भात विधान केलं होतं. “शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”, असं कंगना रणौत म्हणाल्या होत्या.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
BJP MP Kangana Ranaut
खासदार कंगना रणौत,(फोटो-संग्रहित छायाचित्र)

“शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत होतं, ते सर्वांनी बघितली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता”, अशी टीकाही त्यांनी केली होती.

Kangana Ranaut : “शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या”; कंगना रनौत यांचं विधान चर्चेत!

विधानावर टीका, भाजपाचं स्पष्टीकरण

दरम्यान, कंगना रणौत यांनी भाजपाच्या खासदार म्हणून केलेल्या विधानावरून पक्षावर व्यापक स्तरावर टीका होऊ लागली. त्यानंतर भारतीय जनता पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंगना रणौत यांच्या या विधानाशी पक्षानं असहमती दर्शवली आहे.

कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा अधिकारही नाही आणि परवानगीही नाही, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. ‘मंडीतील भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांना यापुढे अशी विधानं न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, त्यांना पक्षाची भूमिका मांडण्याची परवानगीही नाही व अधिकारही नाही’, असं पक्षाकडू स्पष्ट करण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं आह.

Story img Loader