हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदरासंघातून निवडून आलेल्या अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर एका महिला कर्मचाऱ्याने कानाखाली वाजवली. चंदीगड विमानतळावरून त्या दिल्लीला जात असताना हा अपमानजनक प्रकार घडला. यानंतर त्यांनी आता व्हिडिओ प्रदर्शित केला असून त्या सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“मला अनेकांचे फोन येत आहेत. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान चंदीगढमध्ये ही घटना घडली. मी सुरक्षा तपासणीदरम्यान जात होते, तेव्हा दुसऱ्या कॅबिनमध्ये सीआयएसएफची एक सुरक्षा महिला कर्मचारी होती. मी त्यांच्या पुढे निघून जाण्याची त्यांनी वाट पाहिली. मी पुढे निघून गेल्यानंतर माझ्या बाजूने येत त्यांनी माझ्यावर कानशिलात लगावली. मी त्यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात”, असं कंगना रणौत त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या. तसंच, पुढे त्या उद्विग्नपणे म्हणाल्या की, “आंतकवाद आणि उग्रवाद पंजाबमध्ये वाढत असून तो कसा रोखायचा?”

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

तीन कृषी कायद्याविरोधात डिसेंबर २०२० मध्ये देशभरात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. या आंदोलनादरम्यान, कंगना रणौत यांनी आंदोलनाविरोधात टिप्पणी केली होती. या टिप्पणीचा राग मनात धरून या सुरक्षा कर्मचारीने कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावली. तसंच, मी टिप्पणी केलीत तेव्हा मी आईही आंदोलनात सहभागी झाली होती, असं या महिलेने म्हटलं आहे.

दरम्यान, या महिलेचं निलंबन करण्यात आलं असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >> कंगना रणौत यांना विमानतळावर CISF च्या महिलेने थोबाडीत मारल्याचा आरोप, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मंडीमधून कंगना विजयी

मंडी या मतदारसंघातून कंगना रणौत विजयी झाल्या आहेत. अत्यंत अटीतटीच्या लढतीतून त्या जिंकल्या आहेत. त्यांच्या आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनतेचे आभार मानून चंदी लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी काम करणार असल्याचं सांगितलं. क्वीन, क्रिश थ्री, धाकड या चित्रपटांतून काम करणाऱ्या कंगना रणौत लवकरच इमर्जन्सी चित्रपटांत झळकणार आहेत. कंगना यांनी या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका केली आहे. तसंच गँगस्टर हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्याआधी त्या मुंबईत मॉडेलिंग करत होत्या.

Story img Loader