पतियाला न्यायालयाच्या संकुलात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले होते आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या ज्येष्ठ वकिलांच्या समितीने बुधवारी स्पष्ट केले.
कन्हैया कुमार या आरोपीच्या जिवाला गंभीर धोका आहे आणि हे पोलीस त्याचे रक्षण करण्यास असमर्थ आहेत, असे सहा सदस्यांच्या समितीने सर्वोच्च न्यायालयास सांगितले. आमच्यावरही कुंडय़ा आणि बाटल्या फेकण्यात आल्या. संकुलातील वातावरण अभूतपूर्व होते, पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही. जमावाने कडे तोडून आमच्यावर कुंडय़ा आणि बाटल्या फेकल्या.
समितीमध्ये कपिल सिब्बल, राजीव धवन, दुष्यंत दवे, हरिन रावल, अजित सिन्हा आणि प्रशांत भूषण आणि एडीएन राव यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यांनी संकुलाकडे धाव घेतली. यापूर्वी असे वातावरण आम्ही पाहिले नाही, तेथे भीती आणि दहशतीचे वातावरण होते, असे धवन आणि दवे यांनी न्यायालयास सांगितले. आपल्यावर हल्ला झाल्याचे कन्हैया कुमार याने सांगितले, ज्याने मारहाण केली तीच व्यक्ती नंतर न्यायालयात हजर होती, असेही सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा