जेएनयू विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याला बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. कन्हैया याने चौकशीत सहकार्य करावे आणि गरज भासेल तेव्हा त्याने चौकशीला हजर राहावे, अशा अटी न्यायालयाने त्याला घातल्या आहेत. कन्हैयाकुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
कन्हैयाकुमार हा सध्या तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून न्या. प्रतिभाराणी यांनी त्याला बुधवारी दिलासा दिला. कन्हैयाकुमार याला १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तितक्याच रकमेची हमी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. कन्हैयाकुमार याच्यासाठी विद्यापीठातील सदस्यानेच हमी राहिले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.जामीन मंजूर करताना देण्यात आलेल्या आदेशातील अटीचे उल्लंघन केले जाणार नाही, असे लेखी आश्वासन द्यावे लागणार आहे.

Story img Loader