‘जेएनयू’ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारचे प्रतिपादन
मला कोणत्याही प्रकारची राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आणि मी विद्यार्थीच आहे. मला राजकारणात येऊन निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने शुक्रवारी माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केले.
संसद हल्ल्यात दोषी ठरल्याने फाशी झालेला अफझल गुरू हा देशाचा नागरिक होता त्यामुळे त्याच्या फाशीच्या शिक्षेबाबत कायद्याच्या चौकटीत चर्चा करण्यात काही गैर नाही. अर्थात अफझल गुरू नव्हे तर हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेला रोहित वेमुला हा माझा आदर्श आहे, असेही कुमार याने सांगितले.
देशातील नागरिकांनी मला मतदान केलेले नाही. तर जेएनयूतील विद्यार्थ्यांनी मला मते दिली आहेत. मी त्यांचा नेता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांच्यापुरतेच बोलेन. माझे काम अभ्यास करणे आणि ज्यांना तो करता येत नाही त्यांच्यासाठी लढणे हे आहे, असे कुमार म्हणाला. हा लढा प्रदीर्घ काळ चालणारा आहे, म्हणून त्यात विजयी मोर्चा नाही तर ऐक्यतेचा मोर्चा आहे, असे तो म्हणाला.
मी राजकारणी नाही, विद्यार्थीच!
‘जेएनयू’ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारचे प्रतिपादन
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-03-2016 at 02:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanhaiya kumar i am not a politician but a student