जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारला रविवारी एका कार्यक्रमादरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी काळे झेंडे दाखविले. यामुळे संतापलेल्या त्याच्या समर्थकांनी या दोघांना मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. कन्हैयाकुमार हा एस. के. मेमोरियल हॉलमध्ये आयोजित ‘आझादी’ कार्यक्रमात बोलत असताना ‘युथ स्वराज’ या संघटनेच्या दोघांनी कन्हैयाला काळे झेंडे दाखवत ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. या प्रकारानंतर कन्हैयाच्या समर्थकांनी या दोघांना मारहाण केली. नितीशकुमार आणि मणिकांत मणी अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे संघसेवक असल्याची शक्यता असल्याचे पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी सांगितले.

Story img Loader