Kannada Actor Darshan : कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा याला काही दिवसांपूर्वी एका हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून दर्शन थूगुदीपा बेंगळुरूमधील परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात आहे. आता दर्शन थूगुदीपाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे व्हायरल फोटोत दिसत असल्याचं इंडिया टुडेनी एका वृत्तात म्हटलं आहे.

दर्शन थूगुदीपाचे तुरुंगातील व्हीआयपी ट्रीटमेंटचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संबधित तुरुंग प्रशासनाने व्हायरल छायाचित्राची दखल घेत चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, व्हायरल फोटोमध्ये दर्शन थूगुदीपा हा एका उद्यानात बसून शीतपेय पित असल्याचं दिसत आहे. त्याच्याबरोबर अजून काही कैदीही दिसत आहेत. मात्र, एका तुरुंगात असताना अशा प्रकारे एखाद्या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याने तुरुंग प्रशासन आणि सरकारवर टीका होत आहे. तसेच तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, या व्हायरल फोटोबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया कोणाचीही समोर आलेली नाही.

zakir hussain account first post after demise
झाकीर हुसैन यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुटुंबियांकडून पोस्ट; ‘तो’ खास फोटो शेअर करत लिहिलं…
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
digital watch Maharashtra jail
कारागृहातील अर्थकारणावर आता “डिजिटल वॉच”; कैद्यांसह भेटायला येणाऱ्यांचे…
Dhananjay Munde
Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंनी मौन सोडलं, वाल्मिक कराडविषयीही मांडली भूमिका!
ill prisoners bail , medical bail to prisoners,
गंभीररीत्या आजारी असलेल्या कैद्यांना वैद्यकीय जामीन देण्याबाबत विचार करा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
maharashtra assembly winter session
तालिका सभाध्यक्षांच्या निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादीला डावलले
Image of Lawrence Bishnoi.
Lawrence Bishnoi : “लॉरेन्स बिश्नोईची खास सोय, साबरमती तुरुंगात त्याच्याकडे…”, जवळच्या सहकाऱ्याने केला धक्कादायक खुलासा
Tanaji Sawant Changed his Facebook DP and Cover Page
Tanaji Sawant : तानाजी सावंत यांनी फेसबुकचा डीपी आणि कव्हर फोटो बदलला, शिवसेना नाव आणि चिन्हही हटवलं

हेही वाचा : कंगना रणौत यांना ‘संजू’ चित्रपटात काम करण्याची मिळाली होती संधी; म्हणाल्या, “रणबीर कपूर स्वतः माझ्या घरी आला अन्…”

नेमकं प्रकरण काय?

रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा याला अटक करण्यात आली होती. रेणुकास्वामी हा ३३ वर्षीय ऑटोचालक ९ जून रोजी बेंगळुरूमधील फ्लायओव्हरजवळ मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या अंगावर जखमा असल्याची माहिती पोलिसांना स्थानिकांकडून मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनचा चाहता असलेल्या रेणुकास्वामीचे अभिनेत्याच्या सांगण्यावरून एका टोळीने अपहरण करून त्यांची हत्या केली. या प्रकरणातील हत्येच्या संशयात सुरुवातीला ११ जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणात कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा याच नाव समोर आल्यानंतर त्यालाही अटक झाली. यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींच्या कोठडीत वाढ करत २८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. याच दरम्यान अभिनेता दर्शन थूगुदीपाला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

Story img Loader